इतिहास
सोलापूर शहारालगत कर्नाटक व आंध्र प्रदेशलगत असलेला तालुका, कन्नड बहूभाषिक, सिना व भिमा नदीचा कुडल येथे संगम तसेच हेमाडपंथी व संगमेश्वर व हरीहरेश्वर मंदीर आहे.
कुसूर खानापूर येथे मकरसंक्रातीच्या वेळी जत्रा भरते.गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
भंडारकवठे- सोलापूर पासून ४५ कि.मी अंतरावर व कर्नाटक सिमेवर वसलेले गाव असून माघ शुध्द पौर्णिमेस महासिध्द देवाची जत्रा भरते. सदर जत्रेस कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येत असतात.
दक्षिण सोलापूर तालुका सोलापूर शहरालगत वसलेला असून प्रत्येक गावातून शहरासाठी भाजीपाला, दूध इ.पूरविले जाते. तालुक्यातून प्रामुख्याने ज्वारी कडधान्ये व ऊस ही पिके घेतली जातात.